'आयसीस'चे पडघा-बोरीवली मोड्यूल राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून उध्वस्त
SV 19-Dec-2023
Total Views |
ठाणे- देशात इस्लामी जिहादला अनुसरून घातपाती कारवाया करत हिंसाचाराचे थैमान घालण्याचा इरादा असलेल्या 'आयसीस' या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या ठिकाणांवर ठाण्यासह पुण्यात तब्बल ४४ ठिकाणी छापे घातल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने १५ जणांना अटक केली. यानंतर तपासातून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली. या सर्व जिहाद्यांनी ठाणे जिल्ह्यातील पडघा -बोरीवली गावाला परस्पर स्वातंत्र्य जाहीर करून त्याचे नामांतर 'अल् शाम' असे केले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेने धडक कारवाई करून 'आयसीस'चे मोड्यूल उध्वस्त केले.
पुढारी १३/१२/२३