हलाल सर्टिफिकेटवरील बंदीचा परिणाम दिसू लागला

SV    11-Jan-2024
Total Views |
 
      उत्तर प्रदेशात हलाल सर्टिफिकेट असलेल्या उत्पादनांवर घातलेल्या बंदीचे परिणाम दिसू लागले आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये मॅकडोनल्डच्या दुकानांवर छापा घालण्यात आला. मॅकडोनल्डमध्ये हलाल सर्टिफिकेट असलेल्या उत्पादनाचा उपयोग केला जात असल्याचे समजल्यामुळे खाद्य सुरक्षा विभागाच्या टीमने छापा  घातला. पिझ्झा बनवण्यासाठी जे पदार्थ लागतात त्याच्या रॅपरवर हलाल सर्टिफिकेटचा शिक्का असल्याचे आढळून आले. राज्यातील मॅकडोनल्डच्या अन्य दुकानांवर सुद्धा तपासणी करण्यासाठी टीम पाठवण्यात आली आहे. अशा प्रकारे राज्यातील अन्य दुकानांवर व गोडाऊनवर छापे घातले जात आहेत. खाद्य सुरक्षा विभागा कडून लवकरच एक फोन क्रमांक जाहीर केला जाणार आहे, त्यावर फोन करून लोक हलाल सर्टिफिकेट संबंधात माहिती देऊ शकतील.
ऑपइंडिया स्टाफ़ २२.११.२०२३