९ नोव्हेंबर २०१९ साली झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या रामजन्मभूमी निवाड्यानंतर थोड्याच दिवसांत दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी नि:शुल्क राम रसोई सुरु झाली. गेल्या चार वर्षात २५ लाखांहून अधिक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला आहे. वरण-भात-तूप, सांबार, कचोरी, दम आलू, कोफ्ता, तिळाची वडी, चटणी, पापड असे १० पदार्थ या थाळीत असतात. भक्तांना आग्रहाने प्रसाद वाढला जातो.
भक्तांची संख्या हळूहळू वाढत जाऊन मार्च २०२३ नंतर दर महिन्यात जवळजवळ ९० हजार ते १ लाखावर पोचली.सध्या राम रसोईवर रोज सरासरी एक लाख रुपये खर्च होतो. १५ जानेवारी पासून दोन्ही वेळा प्रसाद दिला जाईल. गर्दीचे प्रमाण पाहून प्रसादाची पाकिटेही वाटली जाणार आहेत.
जागरण न्यूज २/१२/२३