प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वी घेणार मंदिराच्या सुरक्षेचा आढावा
SV 24-Jan-2024
Total Views |
२२ जानेवारी २०२४ रोजी श्रीरामाची मंदिरात प्रतिष्ठापना होणार असून यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असतील. त्यादृष्टीने सुरक्षा व्यवस्था कडक असेल. येणाऱ्या यात्रेकरूंना सुरक्षा उपकरणांमधून जावे लागेल. ही सारी उपकरणे ५ जानेवारीपासून मंदिराच्या परिसरात असतील आणि त्यातून तपासणी सुरु होईल. प्रस्तावित राममंदिराचा गाभारा आणि तळघर तयार झालेले आहे. राममंदिर सुरक्षतेची सीमा सत्तर एकर परिसराच्या बाहेर रामकोटा पर्यंत विस्तृत केली गेली आहे. सुरक्षारक्षकांची संख्या वाढवण्यात आली असून रामकोटा मधून प्रवेश करणाऱ्या सर्व रस्त्यांवर बॅरीकेडस् लावण्यात आले आहेत. याठिकाणी यापुढे सुरक्षा रक्षकांचा चोवीस पहारा राहणार आहे.
Abp news २९/११/२३