दुधेश्वरनाथ वेद विद्यापीठाचे विद्यार्थी मोहित पांडे यांची पुजारी म्हणून निवड

SV    27-Jan-2024
Total Views |
 
दुधेश्वरनाथ वेद  विद्यापीठाचा विद्यार्थी मोहित पांडे यांची अयोध्येच्या राम मंदिरात पुजारी म्हणून निवड करण्यात आली. सुमारे तीन हजार पुजाऱ्यांच्या मुलाखतीमधून २० जणांची निवड करण्यात आली. त्यापैकी एक मोहित आहे. निवड झालेल्या सर्व पुजाऱ्यांना सहा महिने शिक्षण दिले जाईल. त्यानंतर त्यांची नियुक्ती केली जाईल. मोहित पांडे हा सीतापूर येथील रहिवासी आहे. त्याने दुधेश्वरनाथ वेद विद्यापीठातून सामवेदचे  शिक्षण घेतले. सामवेदाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आचार्या शिक्षण घेण्यासाठी तो तिरुपतीला गेला. आचार्य पदवी घेतल्यानंतर तो पीएचडीची देखील तयारी करत आहे. अशातच त्याने राम मंदिराच्या पुजारी पदासाठी अर्ज केला होता; त्यात त्याची निवड झाली.                                                             लोकमत ११.१२.२३