'गागाभट्टां' चे वंशज प्राणप्रतिष्ठा करणार

SV    29-Jan-2024
Total Views |
 
 अयोध्येतील राममंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा वाराणसी येथील पंडित लक्ष्मीकांत मथुरानाथ दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. ८६ वर्ष वय असणारे दीक्षित वैदिक विधी शास्त्राचे  गाढे अभ्यासक आहेत. विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे पंडित गागाभट्ट यांचे ते वंशज आहेत. प्राणप्रतिष्ठेच्या धार्मिक कार्यक्रमाची जबाबदारी १२१ पुजाऱ्यांवर आहे. त्यांचे नेतृत्व करणारे पंडित दीक्षित म्हणाले की, 'हा मला मिळालेला माझ्यासाठी आशीर्वाद आहे. प्रभू रामचंद्रांच्या कृपेने मी ही जबाबदारी पार पाडणार आहे.'
 पुढारी ८.१२.२३