स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या म्हणण्यानुसार, ज्यांची निवड ट्रस्टने केली नाही, ते सुद्धा पूजा विधीचे प्रशिक्षण घेऊ शकतात. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. जरी त्यांना सध्या मंदिरात पुजारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली नाही, तरी भविष्यात रामल्लाच्या मंदिरात पुजारी म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते. पुजाऱ्यांना दिले जाणारे प्रशिक्षण श्रेष्ठ संतांच्या द्वारे तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. पुजाऱ्यांना प्रशिक्षण काळात निवास, भोजन निःशुल्क असेल. शिवाय त्यांना २००० रुपये विद्यावेतन दिले जाईल.
ऑपइंडिया ११ .११.२०२३