राममंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या यजमानपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी

SV    31-Jan-2024
Total Views |
 
 पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २२ जानेवारी २०२४ रोजी रामजन्मभूमीवरील भव्य राममंदिरात श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. सुरुवातीला सध्याच्या (तात्पुरत्या) मंदिरात ते रामलल्लाच्या चल मूर्तीचे दर्शन घेतील. ती चल मूर्ती नव्याने बांधण्यात आलेल्या राममंदिराच्या गाभाऱ्यात त्यांनी आणावी अशी विनंती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे पदाधिकारी त्यांना करण्याची शक्यता आहे. मात्र यासाठी सुरक्षा प्रोटोकॉल तोडून पंतप्रधान मोदी यांना ५०० मीटर्स चालत जावे लागेल.
या विशेष प्रसंगी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर असतील. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत याची राममंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात विशेष उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यजमान पदाची भूमिका बजावतील. हा कार्यक्रम सकाळी ११.३० ते दुपारी १.३० पर्यंत चालेल.
रामलल्लाची सध्याची चल मूर्ती नव्या अचल मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात पवित्र स्थानी ठेवण्यात येईल. नवीन अचल मूर्ती नवीन मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवण्यात येईल. पुढे दरवेळी  होणाऱ्या शुभकार्याच्या वेळी  चल मूर्ती आणि अचल मूर्ती बरोबर असतील.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राममंदिर हे तीन मजल्यांचे असणार आहे. तळ मजल्यातील गर्भगृहात रामल्लाच्या एका मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर रामदरबार बनविण्यात    येणार आहे.
श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची सुरवात मकर संक्रांतीच्या दिवशी होईल. नव्याने बनविण्यात आलेल्या मूर्तीला शरयू नदीचे व पवित्र नद्यांच्या जलाने अभिषेक केला जाईन आणि अयोध्या शहरात त्याची यात्रा काढली जाईन त्यानंतर २२ जानेवारीपर्यंत अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
राममंदिर प्राणप्रतिष्ठा साठी ८००० लोकांना आमंत्रित केलेले आहे. त्यात ४००० संत महात्मे असतील. कार्यक्रमासाठी देशाभरातील नेते प्रतिष्ठीत लोक, व्यापारी पद्मपुरस्काराने सन्मानित केलेले यांच्याशिवाय काही  देशांचे राष्ट्राध्यक्षसुद्धा उपस्थित असतील या कार्यक्रमासाठी राममंदिर आंदोलन काळात या ज्या कारसेवकांनी आत्मबलिदान केले त्या कारसेवकांच्या कुटुंबियांनाही आमंत्रित केले आहे.

जनसत्ता  ३.११.२३