एखाद्या विषयाचा मुस्लिम विचारवंत कसा विचार करतात हे वाचकांना समजावे म्हणून सांस्कृतिक वार्तापत्राच्या अंकात उर्दू वृत्तपत्राच्या आधारे मुस्लिम मनाचा कानोसा हे सदर दिले जाते. या सदरातील विचार हे सांस्कृतिक वार्तापत्राचे विचार नसतात; हे वाचकांनी लक्षात घ्यावे.
‘हमास' म्हणजे इस्लामिक प्रतिरोध आंदोलन. सोप्या भाषेत सांगायचे तर 'हमास' म्हणजे यहुदी (ज्यू) शक्तींसाठी डोकेदुखी आणि इस्लामी जगाचा स्वाभिमान होय. संबंध अरब आणि भारतीय उपखंडातील मुस्लिमांच्या वतीने मी 'हमास' चे आभार मानतो. इस्लामसाठी 'हमास'ने दिलेल्या लढयाबद्दल त्यांचे उपकार मानावे तेवढे कमीच.
आपल्याला आता प्रश्न पडला असेल की आपण 'हमास' चे आभार का मानावे, त्यांचे इस्लामसाठी काय योगदान आहे? उत्तर ऐका, 'हमास' च्या ध्येय-धोरणांचा अभ्यास केल्यावर तुमच्या लक्षात येईल की त्यांचे उद्दीष्ट पॅलेस्टाईनच्या भूमीवर असलेले इस्रायलचे अवैध अतिक्रमण हटवायचे आहे. इस्लामसाठी पवित्र असलेले जेरुसलेम शहर आणि येथील पवित्र धार्मिक स्थळे यांना यहुदी सैन्याच्या तावडीतून मुक्त करायचे आहे. त्या पवित्र भूमीवर राहणाऱ्या मुस्लिमांना सुरक्षा प्रदान करायची आहे. याउलट इस्रायलचे उद्दिष्ट काय असा विचार केला तर त्यांच्या राष्ट्रध्वजाकडे बघा. प्रत्येक प्रतिकाचा काहीतरी अर्थ असतो, तसे इस्रायली राष्ट्रध्वजातसुद्धा काहीतरी अर्थ आहे. या ध्वजात दोन आडव्या निळ्या रंगाच्या पट्ट्या आहेत तर त्यामध्ये एक चांदणी. या प्रकाचा अभ्यास केल्यावर जे लक्षात येते त्यामुळे केवळ अरबी नाही तर गैरअरबी मुस्लिमांनी देखील चिंता करण्याची आवश्यकता आहे.
महान इस्लामी शासक सुलेमानच्या राज्याच्या सीमा नाईल नदीपासून तैग्रिस नदीपर्यंत होत्या. नाईल नदी उत्तर आफ्रिकेतील इजिप्त, सुदान आणि इतर देशातून वाहते. तर तैग्रिस नदी इराक, सिरीया आणि तुर्कस्थानच्या काही भागातून वाहते. हा सर्व भूभाग सुलेमानच्या राज्याच्या हिस्सा होता. सुलेमानच्या शासनकाळात त्याची अवज्ञा करणारे यहुदी (ज्यू) त्याच्या मृत्यूपश्चात सुलेमानच्या राज्यावर आपला दावा सांगू लागले. त्यांची अशी भूमिका आहे की, तोरात (ज्यू धर्मग्रंथ) मध्ये असे वर्णन केले आहे, “हे इस्रायल, तुझ्या राज्याच्या सीमा तैग्रिस नदीपासून नाईल नदीपर्यंत आहेत.” यात भर घालत काही यहुदी दावा करतात, “हे इस्रायल, तुझ्या राज्याच्या सीमा तैग्रिस नदीपासून नाईल नदीपर्यंत आणि ऊर्झ (देवदार वृक्ष) नावाची झाडे जेथे येतात त्या प्रदेशापासून ते खजुराच्या प्रदेशापर्यंत आहे.” देवदार वृक्ष आजच्या लेबनॉनमध्ये आढळतो तर खजुरांचा प्रदेश म्हणजे आजच्या मदिना शहराचा संदर्भ आहे. हा संपूर्ण भूभाग म्हणजे दक्षिणेला सुदानपासून ते उत्तरेला सिरीया आणि इराकपर्यंत; तर पश्चिमेला लेबनॉनपासून पूर्वेला मदिना शहरापर्यंत आहे. यहुदी या प्रदेशाला 'ग्रेटर इस्रायल' असे संबोधतात. आता या माहितीच्या आधारे इस्रायलच्या राष्ट्रध्वजाकडे बघूया, दोन आडव्या निळ्या रेषा म्हणजे एक तैग्रिस तर दुसरी नाईलची सीमा आहे. या दोघांच्यामध्ये दोन त्रिकोणांनी बनलेली एक यहुदी चांदणी आहे जिला सहा टोकं आहेत. यातून यहुदी लोकांचे त्यांच्या भौगोलिक सीमेबद्दलचे कट्टर विचार स्पष्ट होतात. एक त्रिकोण हे सृष्टी आणि मोक्ष यांचे प्रतीक आहे तर दुसरा त्रिकोण ईश्वर, इस्रायल आणि दुनिया याचे प्रतीक आहे. आता विचार करा, इस्लामिक दुनियेसाठी इस्रायलचे विचार आणि कार्यपद्धती किती घातक आहेत !
काही दिवसांपूर्वी सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, इजिप्त, सिरीया, जॉर्डनचे शासक एकत्र आले आणि त्यांनी 'अरेबिक नाटो' बनविण्याचा निर्णय घेतला, ज्याचा मूळ उद्देश इस्रायलला मान्यता देणे आणि इस्रायलच्या इशाऱ्यावर काम करणे असा होता. जर या इस्लामी देशांनी इस्रायलला मान्यता दिली असती तर उद्या पॅलेस्टीनी नागरिकांना आंदोलन करण्याचा, विरोध करण्याचा अधिकार राहिला नसता. इस्रायलने त्यांना गुलाम बनविले असते. इस्रायलच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या 'अरेबिक नाटो'तील सहभागी देशात हळूहळू इस्लामी शासन संपवून गैरइस्लामी पद्धतीचे शासन अस्तित्वात आले असते. इराण, लेबनॉन आणि येमेनमध्ये तर इस्रायलचे हल्ले चालूच आहे. मग उरलेल्या इस्लामी देशांवर (तुर्की, पाकिस्तान, तालिबान, इराक) राजकीय दबाव आणून, आर्थिक निर्बंध घालून यहुदी लोकांनी त्यांना गुलाम केले असते. हे सगळे बघून भारतातदेखील हिंदुत्ववादी गुंडांनी उच्छाद मांडला असता, हिंदुस्तानी मुसलमानांच्या विरोधात हिंसा केली असती. परंतु अल्लाहच्या कृपेने हे सगळे टळले कारण त्याच्या अनुयायांवर अल्लाहची मेहेरबानी सदैव असते. ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी अल्लाहचे दूत असलेले 'हमास' चे मुजाहिदीन हवाई, जल आणि भुयारी मार्गाने इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेला छेद देत आत घुसले आणि इस्रायलमधील सर्व घातक शस्रं नष्ट केली. आज एक वर्षानंतर सुपर पॉवर असलेला इस्राईल युद्ध थांबविण्यासाठी विनवणी करत आहे.
‘हमास'च्या हल्याअगोदर यहुदी आणि हिंदुंचा वाढलेला आत्मविश्वास, अरबी देशांची इस्रायलशी जवळीक हे सगळे चित्र आता बदलले आहे. 'हमास'च्या हल्यानंतर इस्रायल आणि अरबी देशांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे, इस्रायलचा पराभव झाला आहे, हिंदू गुंडामध्ये भीतीचे वातावरण आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे जगभरातील मुस्लिम तरुणांना 'जिहाद'साठी नवीन प्रेरणा मिळाली आहे, ते अबू उबेदाह ('हमास'चा प्रवक्ता) याला आपला आदर्श मानायला लागले आहेत. त्यामुळे मला अगत्याने म्हणावेसे वाटते, 'हमास' तुझे धन्यवाद... समस्त इस्लामी जगाकडून तुझे आभार !'
ईब्न हाफिज उस्मान नवसारी
प्राध्यापक- मदरसा जामिया
इस्लामिया तालिमुद्दिन, दाभेळ (गुजरात)
(तहलका टाईम्स, नांदेड २० ऑक्टोबर २०२४)