मुंबई - बांगलादेश आणि म्यानमार येथून भारतात आलेले घुसखोर महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीवर विशेषतः मुंबईच्या राजकारणावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा निष्कर्ष 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस'च्या ('TISS'च्या) अभ्यासातून संशोधकांनी व्यक्त केला. संशोधकांना बेकायदेशीररीत्या स्थलांतरित झालेल्या तीन हजार लोकांच्या अभ्यासातून ही माहिती मिळाली. अंतरिम अहवालात ३०० जणांच्या माहितीचा समावेश होता. घुसखोरांनी गोवंडी, मानखुर्द, माहीम (पश्चिम) आणि आंबेडकरनगर या ठिकाणांना लक्ष्य केल्याचे अहवालातून सांगण्यात आले आहे.
भारत : घुसखोरांचे माहेरघर : घुसखोरांच्या मुसक्या वेळीच न आवळल्याचा हा परिणाम आहे ! देशाची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था यांना धोका निर्माण करणाऱ्या या घुसखोरांना सरकार आणखी किती काळ पोसत रहाणार आहे ? उद्या हेच घुसखोर देशात सत्तेवर बसल्यास आश्चर्य वाटू नये!
मतपेटीच्या राजकारणासाठी घुसखोरांचा वापर ! : बांधकाम आणि घरकाम अशा अकुशल क्षेत्रात हे घुसखोर काम करतात. काही राजकीय लोक यांचा मतपेटीच्या राजकारणासाठी वापर करीत असल्याचे अहवालातून समजते. अशा देशद्रोही राजकारण्यांमुळे देश प्रतिदिन असुरक्षित होत चालला आहे, हे रोखण्यासाठीच हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !
सनातन प्रभात ८.११.२४