चिंतनिका

SV    31-Dec-2024
Total Views |
 
हिंदू, बौद्ध आणि जैन हे तीन प्रमुख प्राचीन धर्म आणि त्यांच्या स्वतंत्र वेगवेगळ्या तत्त्वज्ञानांचे ग्रंथ, पुराणे, कथा, साहित्य, महाकाव्ये, मिळून 'विशाल भारतीय साहित्य' बनते. सर्व धर्मांमध्ये शेतीविषयक महत्त्वाचे विचार मांडले आहेत. ते संख्येने तुरळक, विखुरलेले आहेत, पण महत्त्वाचे आहेत. वैदिक हिंदू धर्म सर्वांत प्राचीन असल्याने त्यातील शेतीचे विचार पाहणे योग्य राहील. संहिता, उपनिषदे, महाभारत, रामायण ही महाकाव्ये, पुराणे, संतसाहित्य असा वैदिक साहित्याचा प्रचंड विस्तार आहे. 'ऋग्वेद' ही पहिली संहिता असून, त्याकडे एकाच वेळी कृषिसंस्कृती आणि ऋषिसंस्कृतीचे उगमस्थान म्हणून पाहिले पाहिजे.

अग्रोवन १४.११.२४