छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या भूमीवर हिंदुविरोधी शक्ती पुन्हा कार्यरत झाल्या आहेत आणि त्यांनी भेदाचे राजकारण खेळायला सुरुवात केली आहे. हिंदुंमध्ये फुट पाडून स्वार्थाची पोळी भाजण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. आपले म्हणणे पटवण्यासाठी ते खोटे बोलतील, तुमच्या मनात संभ्रम निर्माण करतील, तुम्हाला प्रलोभनंसुद्धा दाखवतील. पण त्यांच्या भूलथापांना भुलू नका, कारण हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. देव, देश आणि धर्म यांच्या बाजूने जे आहेत त्यांच्याच पाठीशी उभे रहा !
- संपादक