आपणच जगाचे 'राजे'

SV    13-Feb-2024
Total Views |
 
वेगाने वाढत असलेली अर्थव्यवस्था म्हणून भारताचा लौकिक जगभरात वाढत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत ग्राहकांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. २०३० पर्यंत भारतात ७७ कोटी ग्राहक असणार आहेत. २०२४ च्या तुलनेत ही संख्या तब्बल ४६ टक्क्यांनी वाढणार असल्याचे भाकीत 'व्हिज्युअल कॅपिटलिस्ट'ने  वर्तविले आहे.
या अहवालासाठी जागतिक बॅंक, संयुक्त राष्ट्र संघटना आदींच्या आकडेवारीचा आधार घेतला आहे. दरदिवशी कमीतकमी एक हजार रुपये खर्च करणाऱ्याला ग्राहक म्हणून गृहीत धरले आहे. सर्वाधिक ग्राहकांच्या पहिल्या १० देशांमध्ये बहुतेक देश आशियाई आहेत.

लोकमत १३.२.२४