रामायण, महाभारत काल्पनिक म्हणणाऱ्या शिक्षाची हकालपट्टी

SV    15-Feb-2024
Total Views |
 
रामायण व महाभारत हे काल्पनिक आहे, असे शिकवणाऱ्या एका शिक्षकाला बंगळूरमधील शाळेने अखेर कामावरून कमी केले आहे. मंगलोरमधील सेंट गेरोसा इंग्लिश शाळेतील हे प्रकरण आहे. या शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवताना रामायण आणि महाभारत या काल्पनिक कथा असल्याचे सांगितले होते.
शाळेतील मुलांनी पालकांना सांगितल्यावर त्यांनी भाजप आ. वेदव्यास कामत यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी शिक्षकाच्या बेलगाम विधानांचा निषेध करतानाच कठोर कारवाईची मागणी करीत आंदोलनाचाइशारा दिला होता. त्यानंतर शिक्षण उपसंचालकांनी या प्रकरणाची चौकशी दूरू केली. दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सेंट गेरोसा शाळेने संबंधित शिक्षकाला कामावरून काढून टाकल्याचे जाहीर केले.

पुढारी १३.२.२४