भरतपूर- राज्यात सत्संगाच्या नावाखाली हिंदुंना पैसे आणि शिधा देण्याचे आमिष दाखवून त्यांना ख्रिस्ती बनवल्याचा अनेक घटना समोर आल्या आहेत.. या धर्मांतरामागे इटलीमधील एका संघटनेचा हात असल्याचे उघड झाले आहे. राजस्थानमध्ये धर्मांतराची अनेक केंद्रे कार्यरत आहेत. भरतपूरमध्ये तब्बल २० हजार हिंदुंचे धर्मांतर झाल्याचे समोर आले आहे.'आजार बरे होतील ' असे आश्वासन देण्यात आले. गरिबांच्या बँक खात्यावर लाखो रुपयांचे सहाय्य पाठवण्याचे आमिषही दाखवण्यात आले.
एका हॉटेलमध्ये ११ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी ख्रिस्ती मिशनरयांचा धर्मांतराचा मोठा डाव हाणून पाडला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष अन्वेषण पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
सनातन प्रभात १८/०२/२४