महाआरतीसाठी जोधपूरहून आले ११ रथातून ६०० किलो तूप

SV    03-Feb-2024
Total Views |
 
 रामजन्मभूमी न्यासाबरोबर अनेक संस्था आपापल्यापरीने प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झाल्या आहेत. जोधपुरजवळच्या बनाड येथील महर्षी सांदिपनी राम धाम गोशाळेतून देशी गाईपासून बनलेले ६ क्विंटल तूप राममंदिरातील आरतीसाठी वापरले जाईल आणि होम-हवनात सुद्धा त्या तुपाची आहुती दिली जाईल. राममंदिरात अखंड ज्योत लावण्यासाठीही हेच तूप वापरण्यात येईल.  १०८ कलशांमध्ये भरलेले हे तूप १००० किलोमीटर अंतर पार करण्यासाठी बैल जोडलेल्या सुसज्ज रथातून निघाले आहे.   
पंजाब केसरी २.१२.२३