थायलंडहून येणार राममंदिरासाठी खास भेट

SV    05-Feb-2024
Total Views |
 
 रामजन्मभूमीवरील ऐतिहासिक रामंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरु आहे. यासाठी इतर देशांमधूनही अनेक गोष्टी आल्या आहेत. नेपाळमधील गंडकी नदीतील शिळा मूर्ती तयार करण्यासाठी आल्या   तर थायलंडने देखील दोन नद्यांचे पाणी पाठवले आहे. लवकरच तिथून एक विशिष्ट प्रकारची मातीही पाठवली जाईल.
थायलंड खेरीज जगातील १५५ देशांमधून पाणी आलेले असून त्यात फिजी, मंगोलिया, डेन्मार्क, भूतान, रोमानिया, हैती, ग्रीस, कोमोरोस, कबेवर्ड, मोंटी निग्रो, टूवालू, अल्बानिया आणि तिबेट या देशांचा समावेश आहे.
थायलंड आणि भारताचे सांस्कृतिक संबंध प्राचीन काळापासून आहेत. बँकॉक मध्ये त्यांनी राममंदिराची प्रतिकृती उभारली आहे.  थायलंडमध्ये घराघरात गणेशाची मूर्ती आढळते. मंत्रालयांची प्रतिकं हिंदू चिन्हांशी साधर्म्य दाखवणारी आहेत. गरुड त्यांच्या अनेक विभागांचे प्रतिक आहे. रामाच्या वंशजांचे शासन तिथे आहे. म्हणजे प्रत्यक्षात रामराज्यच!

इंडिया टी.व्ही. २८/११/२३