रशिया-युक्रेन युद्धासाठी भारतीयांची तस्करी

SV    09-Mar-2024
Total Views |
 
रशिया-युक्रेन युद्धाचे पडसाद जगभरात विविध स्वरुपात उमटत आहेत. या युद्धासाठी झालेल्या छळवणुकीचे धागेदोरे थेट भारतापर्यंत पोचले आहेत. फसवणूक करून भारतीयांना युद्धात ढकलणारी टोळीच केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय ) उघड केली आहे. मानवी तस्करीच्या कामात  सामील असलेल्या मूळच्या राजस्थानच्या आणि सध्या रशियात राहणाऱ्या दोन एजंटबाबत सीबीआय माहिती गोळा करत आहे. रशियाच्या सैन्यात काम करण्यासाठी भारतीयांच्या झालेल्या फसवणुकीचा मुद्दा भारताने रशियासमोर उपस्थित केला आहे.
९/३/२४ महाराष्ट्र टाईम्स