उत्तरप्रदेशातील लाक्षागृह भूमी हिंदुंना परत मिळाली

SV    12-Apr-2024
Total Views |
 
         आचार्य कृष्णाशास्त्री ब्रह्मचारी नावाच्या एका विद्वानाने आणि त्यांच्या पुढील वारसांनी १९७० पासून हा लढा जवळपास ५३ वर्षे न्यायालयात लढा लढून पांडवकालीन लाक्षागृह हे स्थान मुसलमानांच्या दास्यातून मुक्त केले. उत्तरप्रदेशमधील बागपतजवळ लाक्षागृह टिला नावाचे स्थान आहे. कौरवांनी पांडवांना लाक्षागृहात जाळून मारण्यासाठी जी योजना आखली, ते हे स्थान आहे. ही जागा किती आहे ?  १०० बिघा म्हणजे पावणे सहाशे एकर आहे.
          मुकीम खान नावाच्या एका गृहस्थाने हे स्थान, म्हणजे आमचे कब्रस्तान आणि ‘बद्रुद्दिन’ नावाच्या सुफी संतांच्या मजारीचे (इस्लामी पीराचे थडगे) ठिकाण आहे’, असा दावा केला. त्या वेळी आचार्य कृष्णाशास्त्री ब्रह्मचारी यांनी त्याला आव्हान दिले आणि त्या जागेत ‘हिंदू मंडळी हे गुरुकुल व गोशाळा चालवत आहेत’, असे सांगितले.
          पुरातत्व विभागाने ही जागा संरक्षित केली होती. वर्ष १९५३ मध्ये पुरातत्व विभागाने तेथे खोदकाम केले होते. त्या वेळी त्या खोदकामात जवळपास ४ हजार ५०० वर्षे आधीच्या वस्तू मिळाल्या होत्या. त्या आजही भारतीय पुरातत्व विभागाजवळ जमा आहेत. तरीसुद्धा धर्मांधांनी तिथे अनधिकृतपणे मजार उभारली आणि ही जागा गिळंकृत करण्यास आरंभ केला. वक्फ बोर्डाने ‘ही जागा आमची आहे’, असा दावा केला होता. शास्त्रीजींनी मात्र ठाम विरोध करून आधी बागपत न्यायालय आणि पुढे मेरठ न्यायालय येथे हा लढा लढला आणि आज ५३ वर्षांपेक्षा अधिक काळाने ‘लाक्षागृहाची जागा ही हिंदुंचेच तीर्थक्षेत्र आहे’, असे न्यायालयाने सर्व साक्षी पुरावे आणि विविध सर्वेक्षण यानुसार मान्य केले.          
                – वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, जि. सिंधुदुर्ग. सनातन प्रभात ५.२.२०२४