पॅलेस्टाइनचा प्रश्न सुटेल अशी चिन्ह आज तरी दिसत नाही. २०४८ साली इस्राइल स्थापनेची १०० वर्षे पूर्ण करेल तेव्हा ग्रेटर इस्राइलचे त्यांचे स्वप्न अस्तित्वात यावे यासाठी गुप्तचर यंत्रणांमार्फत रणनीती आखली जात आहे. यावर चर्चा करण्याआधी मुस्लिम समाज आज कसा इस्लामपासून दुरावला आहे, पथभ्रष्ट झाला आहे याची चर्चा करूया. रमजानचा पवित्र महिना चालू आहे, सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. बाजारातील रेल चेल, गैरइस्लामी प्रथा यालाच आपण रमजानमधील आनंद आणि उत्साह म्हणतोय. आपण मुस्लिमविरोधी, गैरइस्लामी शक्तींच्या जाळ्यात अडकलो आहोत. रमजानच्या नावाखाली शैतानाचे अनुयायी असल्यासारखे आपण वागत आहे. गोल टोप्या घालून रमजान महिन्यात आपण मटणासाठी रस्त्यावर एक दुसऱ्याला मारझोड करतो. रमजान ऑफर, डिस्काउंट सेलच्या नावाखाली गर्दी करणाऱ्या हिजाब घातलेल्या आपल्या महिला नैतिक मर्यादा सोडून वागत आहे. एखाद्या रमजान फेस्टिवलमध्ये कुणी सेलिब्रिटी आला तर आपल्या हिजाबी मुली त्या गैरपुरुषासोबत सेल्फी घेण्यात, संधी मिळाली तर त्याला मिठी मारण्यात एक दुसऱ्याला मागे टाकतात. रमजानमध्ये व्यवसाय करण्यावर बंदी नाही पण व्यवसायाच्या नावाखाली रमजानचे पावित्र्य भंग केले जात आहे ते खेदजनक आहे. सगळ्यांच्या तोंडाला याबाबत कुलूप आहे, कुणी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्याला मागास ठरविले जाते!
गाजाची समस्या फक्त पॅलेस्टाइनपुरती मर्यादित नाही, येत्या काळात आपल्यालादेखील त्याचे चटके बसतील. त्या ट्रेलर आपल्याला अनेकदा बघायला मिळाले आहे. आपण सध्या गफलतीत आहोत कारण ज्यांनी योग्य मार्गदर्शन करायला हवे ते हरविले आहे. दज्जाल पृथ्वीवर कधी येणार ते अल्लाहलाच ठाऊक पण त्याच्या आगमनाच्या पाऊलखुणा दिसू लागल्या आहेत. (दज्जाल: इस्लामी मान्यतेनुसार कयामत येण्याअगोदर एक शैतान पृथ्वीवर अवतरीत होईल जो अल्लाहचा प्रेषित असल्याचा खोटा दावा करून मुस्लिमांना पथभ्रष्ट करण्याचा प्रयत्न करेल) आपणसुद्धा त्यापासून सुरक्षित नाही. आपण आपल्या इस्लामी कर्तव्यांना ज्याप्रकारे मनोरंजनाचा भाग बनविले आहे, हे दज्जालाच्या षडयंत्राचाच भाग असू शकते. हैदराबाद असो किंवा हिंदुस्तान, शहर असो किंवा आखाती देश; मुसलमान फक्त नाममात्र राहिले आहेत. काही दशकांपूर्वी ख्रिश्चन मिशनरी मुस्लिम मुलांचे मन परिवर्तन करीत असे, परंतु आज काल मुसलमानांनी संचालित केलेल्या शाळांमध्ये देखील अशा प्रकारे शिक्षण दिले जात आहे ते बघता भविष्यात त्या मुलांना स्वत:ला मुसलमान म्हणून घ्यायला देखील लाज वाटेल.
माझ्या एक मित्राने एक गुप्तचर विभागाचा अहवाल मला पाठविला आहे. त्याच्या मते तो अहवाल एका मुस्लिम विरोधी देशाच्या गुप्तचर विभागाच्या भविष्यातल्या योजनांची माहिती देणारा आहे. त्याच्या मते इस्राइलने अमेरिका आणि ब्रिटन यांच्या गुप्तचर विभागाच्या मदतीने अरब आणि अन्य मुस्लिम देशांच्या विरोधात योजना आखलेली आहे. अरब आणि मुस्लिम ओळख त्यांना संपवायची आहे. अरबी देशातील सत्ताधाऱ्यांच्या मदतीने संपूर्ण अरब भूमीवर याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. या अहवालाची सत्यता पडताळली गेली नसली तरी यात नोंद केलेल्या अनेक बाबी चिंतेत टाकणाऱ्या आहेत. इस्राइल अरब सत्ताधाऱ्यांच्या मदतीने इस्लामवादी शक्तींच्या विरोधात लढेल आणि त्याजागी एक धर्मनिरपेक्ष मांडणी असलेला इस्लाम प्रस्थापित करेल. यामुळे अरब जगतात अब्राहमीक पंथिय (यहुदी, ख्रिश्चन, मुस्लिम) यांच्यात शांतता नांदेल. पारंपरिक इस्लामी धर्मग्रंथाऐवजी नवीन धर्मग्रंथ लिहिले जातील ज्यात इस्लामची नवीन पद्धतीने मांडणी केली जाईल. ज्यात अब्राहमीक पंथिय आणि सेक्युलॅरीजम यावर जोर दिला जाईल. सेक्युलॅरीजमच्या प्रचारासाठी तसे प्रशिक्षण दिले जाईल. सरकारी शाळा, कॉलेजमध्ये अरबी भाषा, कुराण या विषयांचे शिक्षण बंद केले जाईल. इस्लामी विद्यापीठांना टाळे ठोकले जाईल. लाऊडस्पीकरवर नमाज पठन करण्यास बंदी घातली जाईल. विकासाच्या नावाखाली जास्तीत जास्त मशिदी उद्ध्वस्त केल्या जातील. इस्लामी प्रथा परंपरांवर बंदी घातली जाईल. मशिदीत प्रवचनासाठी सेक्युलर विचारसरणीच्या लोकांना थोपले जाईल. इंग्लिश आणि हिब्रू यांना विज्ञानाच्या भाषा म्हणून प्रस्तुत केले जाईल. जगभरातील इस्लामी विचारकांना आणि प्रचारकांना एक तर संपविले जाईल किंवा त्यांना अपमानित केले जाईल. जे ऐकणार नाही त्यांना जेलमध्ये टाकण्यात येईल किंवा नजरकैदेत ठेवण्यात येईल. शासनकर्त्यांच्या धोरणांना समर्थन देण्यासाठी त्यांना बाध्य केले जाईल. जे विरोध करतील त्यांच्यावर आतंकवाद, कट्टरवाद याच्या नावाखाली गुन्हे दाखल केले जातील, त्यांना प्रताडीत केले जाईल. अरब जगतातील इस्लामी रूढी रिवाज, कॅलेंडर, सरकारी सुट्या बदलल्या जातील. सेक्युलर कायदे लागू केले जातील, हिजाबवर बंदी घालण्यात येईल, अश्लीलता- नग्नता- समलैंगिकता यांना प्राधान्य दिले जाईल. अरब समाजातील खानदान आणि टोळ्या यांची संरचना पूर्णपणे उखडली जाईल. नवीन शहरे उभारली जातील. एक लाखपेक्षा अधिक चर्चेस आणि मंदिरे निर्माण केली जातील, ज्याची सुरुवात झालेली आहे. मुसलमानांना त्यांच्या पवित्र भूमीतूनच बेदखल करण्याची मोहीम इस्राइलने अरब शासकांच्या मदतीने हाती घेतली आहे. आखाती देशातील नवीन शहरात दारू दुकान, डिस्को नाइट क्लब्स असतील. किनारपट्टीच्या भागात नग्नतेचे सर्रास प्रदर्शन करणारी शहरे उभारली जातील. दुबई, सिनाई आणि नियोम या शहरात याची पायाभरणी झालेली आहे. या शहरांत १०० दशलक्ष अन्यधर्मीय लोक वसविण्यात येतील. १५ दशलक्ष गैरअरब आणि मुस्लिम मजुरांना वसविण्यात येईल. ज्यातील ७ दशलक्ष एकट्या युएईमध्ये असतील जे एकूण लोकसंख्येच्या ७०% असतील. येत्या काळात आखाती भूभागात १०० दशलक्ष गैरअरब, गैरमुस्लिम मजुरांना आणले जाईल, यातील ५० दशलक्ष केवळ सौदी अरेबियात आणले जातील. ५ दशलक्ष यहुदींना देखील वसविण्यात येईल आणि त्यांना नागरिकत्व देखील देण्यात येईल. विशेष सुविधादेखील त्यांना प्रदान करण्यात येतील. यहुदी प्रार्थना स्थळे, शाळा, कॉलेज स्थापन करून त्यांना उच्च पदावर नियुक्त केले जाईल, जेणेकरून लष्कर, न्यायव्यवस्था, प्रशासन यावर ताबा मिळविता येईल. फक्त १० वर्षानंतर आखाती देशात लष्करी बंड करून राज्यकर्त्यांना पायउतार करण्यास भाग पाडले जाईल. अरबांची लोकसंख्या घटवून गैर अरबांची लोकसंख्या वाढविण्यात येईल. काही वर्षानंतर सौदी अरेबिया आणि येमेन मध्ये इस्राइल आणि पाश्चिमात्य देशांचे पूर्ण वर्चस्व असेल. अरबी समुद्रातून होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण मिळविले जाईल, छोट्या मोठ्या बेटांवर १०० लष्करी तळे उभारली जातील.
माझ्या मित्राने पाठविलेला हा रिपोर्ट कितपत सत्य आहे? हा प्रश्न आपल्या जागी राहू द्या. परंतु आजची अरब देशातील परिस्थिती बघितली तर हा रिपोर्ट खरा आहे हेच दिसते. पवित्र मदिना शहरात मूर्तीपूजकांनी प्रवेश केला. या पवित्र भूमीवर दारू दुकान, डिस्को, चित्रपटगृह सुरू झाले आहेत. हे कमी की काय आता अरब महिला आंतरराष्ट्रीय सौन्दर्य स्पर्धेत भाग घेणार आहे. मूर्तीपूजकांचे अड्डे अरब देशात सुरू करण्यात आले आहेत, केवळ एवढेच नही तर अरब सत्ताधीश अशा गैरइस्लामी आयोजनात सहभागी होत आहेत. इस्लामी हिजरी कॅलेंडरला सोडचिठ्ठी दिली जात आहे, शुक्रवारऐवजी रविवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आखाती देशात आज मोठमोठ्या पदांवर कोण लोक काम करीत आहे हे लपून राहिले नाहीये. ही समस्या केवळ अरबांचीच नाही, आपण आपल्या आजूबाजूचा आढावा घ्या. मदरशांना संपविण्याची भाषा केली जात आहे. सेक्युलॅरीजमच्या नावाखाली मुस्लिमांना इस्लामपासून दूर केले जात आहे. संमिश्र समाज, व्यक्तीस्वातंत्र्य, उदारमतवाद याच्या नावाखाली नव्या पिढीला पथभ्रष्ट केले जात आहे, ज्यांनी मार्ग दाखवायला हवा ते स्वत: पथभ्रष्ट झाले आहेत.
डॉ. सईद फाजील हुसेन परवेज (हैदराबाद),
(तहलका टाईम्स, ०९ एप्रिल २०२४)