मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्म आपलासा करणाऱ्या २३ वर्षीय मुलीने तिचे नातेवाईक आणि मौलाना यांनी दिल्लीत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली आहे. मौलानाकडून मशिदीत मुलींवर बलात्कार केला जात असे, याची ही मुलगी व्यक्तीशः साक्षीदार असल्याचा दावा तिने केला आहे. त्यामुळेच तिने इस्लाम सोडण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले.
तिचे चार मामा आणि मौलाना यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. नंतर चार बुरखाधारी सशस्त्र मुलांनी तिला दिल्लीतच नग्नावस्थेत सोडले. ही घटना १३ मार्च २०२४ रोजी घडली. पोलिसांनी या प्रकरणी १७ मार्च रोजी जुनी दिल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
ही पीडित मुलगी उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील आहे. गेल्या तीन वर्षांपासून ती मुंबईत राहात असून ती मेकअप आर्टिस्ट आणि फॅशन डिझायनर म्हणून काम करते आहे. तिच्या वडिलांचे सन २०१२मध्ये देहावसान झाल्यानंतर ती मुरादाबाद जिल्ह्यातील देप्पूर या तिच्या मामाच्या गावी राहू लागली. तिथे ती मदरशामध्ये शिक्षण घेत होती.
तिच्या आईचे वडील म्हणजेच तिचे आजोबा अन्वर हुसैन आणि मामा मेहबूब अली यांच्या मालकीची मुरादाबाद जिल्ह्यात ३५० एकर जमीन होती. आजोबा आणि मामाच्या निधनानंतर पीडितेची आईच या जमिनीची वारस होती. मात्र तिच्या आईची चुलतभावंडे इम्तियाज, इरफान, अफसर आणि असर हुसैन यांनी ही जमीन त्यांच्या नावे करण्याचा तगादा लावला. पीडितेने केलेल्या तक्रारीनुसार तिची आई तब्बल १४ वर्षे त्यांच्या नियंत्रणात होती. जेव्हा पीडित मुलीला मुंबईत नोकरी मिळाली, तेव्हा तिने तिच्या आईची त्यांच्या ताब्यातून सुटका केली.
न्यूज दणका २६/ ३/२४