अल्पसंख्यकांचा अपमान करणारे - केजरीवाल

SV    03-May-2024
Total Views |
 
 'सी.ए.ए.' कायदा लागू झाल्यानंतर, देशभरात आनंदाची लाट पसरली. परंतु अनेकांचा यामुळे जळफळाटसुद्धा झाला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी तर हिंदू जैन, शीख शरणार्थी  थेट 'पाकिस्तानी' असल्याचे सांगत, नव्या वादाला तोंड फोडले. हे शरणार्थी 'सीएए कायदा लागू झाल्यानंतर, आनंद साजरा करत असतानाच तिकडे  केजरीवालांनी त्यांना थेट पाकिस्तानी व गुन्हेगारांचा रंग देऊन टाकला. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित स्वत: शरणार्थी असल्याचे सांगत असतात; मग केजरीवाल त्यांनाही पाकिस्तानी टॅग देणार का?
केजरीवालांच्या या बेताल वक्तव्यानंतर दिल्लीतील शरणार्थीनी केजरीवालांच्या शिशमहालावर मोर्चा काढला. पाक, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून गरीब लोक भारतात येतील आणि येथील लोकांच्या नोकऱ्या,  घरे हिसकावून घेतील. आपण त्यांच्यासाठी आपले दरवाजे का  उघडतोय, असा प्रश्न  केजरीवालांनी उपस्थित केला . त्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की  कोणतेही शरणार्थी येणार नाही, सगळे शरणार्थी पहिल्यापासूनच भारतात आले आहेत. २०१४ पर्यंत जे शरणार्थी भारतात आले आहेत त्यांनाच भारताचे नागरिकत्व दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले,.नागरिकत्व देण्याचा आधार गरिबी नाही, तर धार्मिक छळ  आहे.
मुंबई तरुण भारत १९/३/२३