भारतीय संरक्षण विभागाच्या तिन्ही दलात आता पुरुषांप्रमाणेच महिलांनाही संधी देण्यात येत आहे. जात, पंथ, धर्म आणि लिंग यांमधील फरक विसरुन सगळ्यांना समान संधी देण्याचे भारतीय सशस्त्र दलाचे उद्धिष्ट आहे. याच उद्धिष्टाला अनुसरुन भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर प्रथमच एका महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रेरणा देवस्थळी असे त्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. 'आयएनएस त्रिंकट' या भारतीय युद्धनौकेच्या नेतृत्वपदी नियुक्त करण्यात आली आहे. प्रेरणा देवस्थळी सध्या युद्धनौका INS चेन्नईवर फर्स्ट लेफ्टनंट म्हणून कार्यरत आहेत. मूळच्या मुंबईच्या रहिवासी असलेल्या प्रेरणा यांचे शालेय शिक्षण कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरीमध्ये झालं आहे. प्रेरणा यांनी सेंट झेवियर्स महाविद्यालयातून मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. २००९ मध्ये त्या भारतीय नौदलात सामील झाल्या. लहापणापासून देशभक्तीचे धडे घरातच मिळालेल्या प्रेरणाचे भाऊही नौदलात सेवेत आहेत.
लोकमत ४/१२/२३