संत साहित्य काळाची गरज

SV    16-Jan-2025
Total Views |
 


आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात माणूस, भरकटलेला दिसून येतो. आजही जातीभेद, पंथभेद, उच्चनीचता, अंधश्रद्धा आपल्यात दिसून येतात त्यामुळे मनुष्याने संत साहित्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनाचं तत्वज्ञान समजावून जर वाटचाल केली तर  त्याची  दिशाभूल कधीच होणार  नाही.


पर्यावरणाचे महत्व , स्वच्छतेचे, वृक्षांचे महत्व, संसार म्हणजे काय हे सांगण्याचे कार्य संत साहित्याने केलेले आहे. गाडगेबाबांनी दगडात देव नसून माणसात देव आहे हे सांगितले तर बहिणाबाईनी जेव्हा हाताला चटके बसतात तेव्हाच खायला भाकरी मिळते असं सांगून जीवनातील कष्टाचे महत्व पटवून दिले पण अजूनही मानवाला या संत साहित्याचे महत्व कळलेलं नाही. भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या मानवाकडे सुख, शांती याचीच कमतरता दिसून येते. आजच्या धकाधकीच्या जीव‌नामुळे मनुष्य मनःशांती , समाधान हरवून बसलेला अशा मानसिक आजारांवर एकच औषध आहे ते म्हणजे संत साहित्य.