डहाणू (Dahanu) – कासवांची (Turtles) तस्करी आणि समुद्रातले वाढते प्रदूषण, कचरा, जाळ्यात अडकून समुद्री कासवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पालघर (Palghar) इथे वनविभाग आणि डहाणू वन्यजीव संरक्षण आणि पशुकल्याण संघ यांनी संयुक्तपणे कासवांना वाचवण्यासाठी एक मोहीम सुरू केली आहे. पालघरच्या किनाऱ्यावर मोठ्या संख्येने जखमी कासवे आढळतात. त्यांच्यासाठी इथे एक उपचार केंद्र सुरू केले आहे. एक्स रे काढून लेसर पद्धतीने डॉक्टर कासवांवर उपचार करतात. कासवांसाठी खाऱ्या पाण्याचे हौद तयार केले आहेत. जखमी कासवाला इथे घेऊन येणाऱ्याचा तसेच कासवाला वाचवणाऱ्या व्यक्तीचा सत्कार करण्यात येतो.
इथे प्रजननासाठी अनुकूल वातावरण असल्यामुळे मोठ्या संख्येने कासवे येतात. त्यांचा आकारही मोठा असतो. सध्या इथे १२ कासवं आहेत. आतापर्यंत ५०० कासवांवर उपचार करून त्यांना वाचवण्यात आले आहे. नुकतेच ११० किलो वजनाचे 'ग्रीन कासव' प्रजातीचे कासव समुद्रात सोडण्यात आले.