सामाजिक जबाबदारी निभावण्याच्या दृष्टीने खाजगी क्षेत्रात काम सुरु असते. या अंतर्गत पुणे, नाशिक, सोलापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यात ग्रामीण भागात बायोगॅस संयंत्रांची उभारणी करण्यात आली आहे. पाळीव जनावरांच्या शेणापासून बायोगॅस तयार करता येतो. लाकूड किंवा शेणाच्या गोवऱ्या पेटवून चूल वापरली की धूर होऊन ग्रामीण महिलांना श्वसनाच्या आणि डोळ्यांच्या आजारांचा सामना करावा लागतो. त्यापासून या महिलांची सुटका झाली आहे. शिवाय एल.पी.जी.सिलिंडरचा वापर कमी झाला आहे. एखाद्या कुटुंबात ३-४ जनावरे असली की त्यापासून मिळणाऱ्या इंधनाद्वारे कुटुंबाचा स्वयंपाक होतो.
खाजगी क्षेत्रातील अनेक कंपन्या यासाठी आता पुढे आल्या असून या सामुहिक प्रयत्नांमुळे सहा वर्षात २२ राज्यात ८०,००० पेक्षा जास्त बायोगॅस संयंत्रे बसवण्यात आली. घरातील महिलांना जसा लाभ होतो तसा शेतकऱ्यांना शेणखताच्या रूपाने फायदा होतो. एकदा उभारणीचा खर्च केला की दर महिन्यात खर्च करावा लागत नाही.
पर्यावरणाचे रक्षण होण्यात यामुळे मोठा हातभार लागतो.
दैनिक भास्कर १४.१०.२४