पुण्यात 'लव्ह जिहाद'चा कळस

SV    18-Jan-2025
Total Views |
 

           'शादी डॉट कॉम'च्या माध्यमातून एका जिहादी तरुणाने २५ पेक्षा अधिक महिलांची फसवणूक करीत त्यांचे शोषण केल्याची घटना समोर आली आहे. हा सर्व 'लव्ह जिहाद'चा प्रकार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. फिरोज निजाम शेख (वय ३२) याला कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवार, दि. १२ जानेवारी पुण्यातून अटक केली आहे.

 

        कोल्हापूर शहरातील एका घटस्फोटित महिलेने 'शादी डॉट कॉम'वर नाव नोंदणी केली होती. त्यावरून तिचा मोबाईल नंबर मिळवून फिरोज शेखने लग्न करण्याची तयारी दर्शवली. महिलेच्या घरी येऊन त्याने इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सांगितले. त्यानंतर ओळख वाढवून तिला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. व्यावसायिक अडचण असल्याचे सांगून त्याने वेळोवेळी महिलेकडून १ लाख, ६९ हजार रुपयांची रोकड आणि ८ लाख, २५ हजारांचे दागिने उकळले. मात्र, लग्नाचा तगादा सुरू होताच त्याने ब्रेन ट्यूमर झाल्याचे सांगत महिलेला टाळण्यास सुरुवात केली.                 

 
      आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने दि. १० जानेवारी रोजी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. कोल्हापूरच्या पोलीस पथकाने पुण्यातील कोंढवा येथून संशयिताला अटक केली. त्याचे एक लग्न झाले असून, कुटुंबात पत्नी आणि दोन मुले आहेत. पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने २५ महिलांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. यातील काही महिलांकडून त्याने लाखो रुपये उकळले आहेत.
 

महाराष्ट्र टाईम्स १४.१.२५