चीन सीमेजवळ शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण

SV    21-Jan-2025
Total Views |
 
चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पँगाँग तलावाच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण भारतीय लष्कराच्या वतीने करण्यात आले. समुद्र सपाटीपासून १४ हजार ३०० फुटांवर हा पुतळा बसवण्यात आला आहे.
लढवय्या राजा शिवरायांच्या प्रतिमेमुळे लष्कराला कायम प्रेरणा मिळत राहीलअसे लष्कराच्या लेह येथील १४ कॉर्पस्च्या मुख्यालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या पुतळ्याचे अनावरण १४ कॉर्पसचे जनरल कमांडिंग ऑफिसर लेफ्ट. जनरल हितेश भल्ला यांच्या हस्ते झाले. शिवराय हे धाडसदूरदृष्टी आणि न्यायाचे मूर्तिमंत प्रतीक होतेअसे भल्ला म्हणाले.
देशातील पुरातन आदर्शांना प्रेरणास्रोत बनवण्याचा लष्कराचा प्रयत्न आहे. भारत आणि चीनमध्ये अलीकडेच डेमचोक आणि डेप्सांग येथून लष्कर मागे घेण्याबाबत मतैक्य झाले होते. त्यानंतर या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

पुढारी २९/१२/२४