छत्रपती संभाजीनगर : जिल्हा महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत जिल्ह्यात नवतेजस्विनी महिलांना विविध व्यवसाय उभारण्यासाठी आर्थिक बळ मिळत असून, येत्या काळात जिल्ह्यातील ५७८ गटांसाठी २७ कोटी ६५ लाख ९८ हजार रुपयांचा आराखडा मंजूर झाला आहे. नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली.
डिसेंबर २०२४ अखेर १८७ गावांमध्ये ३९६९ महिला बचतगट असून, त्याद्वारे ४० हजार ८०३ महिला जोडल्या गेल्या आहेत. तसेच १७० गावांमध्ये १२६७ महिला बचतगट सदस्य महिलांना १ कोटी ९० लाख ५ हजार रुपये अर्थसाहाय्य विविध व्यवसायासाठी वितरित केले आहे.
शेळीपालन, जीवामृत तयार करणे, दुग्ध व्यवसाय व पनीर उद्योग, मदर पोल्ट्री युनिट अशा विविध व्यवसायांसाठी त्यातून चालना मिळते आहे. सहा सुधारित शेळीपालन व शेळी खरेदी-विक्री केंद्र उभारण्यात आले असून १६ गावांमधील ६०० महिलांचा यात समावेश आहे. या प्रकल्पासाठी ९० लाख निधी मिळाला. शेळीपालन, जीवामृत तयार करणे, दुग्ध व्यवसाय व पनीर उद्योग, मदर पोल्ट्री युनिट अशा विविध व्यवसायांसाठी त्यातून चालना मिळते आहे.
चार गावांमध्ये २०० महिला जीवामृत व द्रव युनिट बनवित आहेत. त्यासाठी १९ लाख ९० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
लोकमत १९.१.२५