'समान नागरी कायदा' ला उत्तराखंड मंत्रिमंडळाची मंजुरी

SV    22-Jan-2025
Total Views |
 
उत्तराखंड मंत्रिमंडळाने 'समान नागरी कायद्या'च्या नियमांना मान्यता दिली आहे. आता ते लवकरच राज्यात लागू केले जाणार असून त्यासाठी दि २१ जानेवारी रोजी रंगीत तालीमही होणार आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य 'मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये 'समान नागरी कायदा' नियमावलीस मंजुरीचा प्रस्ताव आणण्यात आला. मुख्यमंत्री धामी म्हणाले की,"२०२२ साली आमच्या सरकारने 'समान नागरी कायदा' विधेयक आणून लोकांना दिलेले वचन पूर्ण केले आहे. तेव्हापासून राज्य सरकार सर्व प्रक्रिया पूर्ण करून ते शक्य तितक्या अमंलात आणण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. उत्तराखंडसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की, 'समान नागरी कायदा लागू करणारे हे देशातील पहिले राज्य आहे.'   

मुं.त.भा २१.१.२५