नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख सेनानी. ओरिसातील कटक इथे जन्मलेल्या सुभाषबाबूंची जयंती २३ जानेवारी रोजी साजरी केली जाते. भारतीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊनही त्यांनी ब्रिटीशांची चाकरी करण्यास नकार दिला. त्यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली होती मात्र गांधीजी आणि इतर नेत्यांशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली.
दुसऱ्या महायुद्धात जर्मनी आणि जपान यांच्या मदतीने त्यांनी ‘आझाद हिंद सेनेची’ स्थापना केली. ‘जयहिंद’ ‘तुम मुझे खून दो, मी तुम्हे आजादी दूंगा ’ आणि ‘चलो दिल्ली’ या नेताजींनी दिलेल्या घोषणा स्वातंत्र्यलढ्यात अजरामर झाल्या.
हिंदुस्थान टाईम्स २३.१.२५