मंदिराची प्रदक्षिणा करण्याची पद्धत आणि महत्त्व
SV 23-Jan-2025
Total Views |
प्राणप्रतिष्ठापना झालेल्या देवतांच्या मूर्तींना प्रदक्षिणा घालणे ही एक विज्ञान संमत प्रक्रिया आहे. ज्या ठिकाणी किंवा मंदिरात देवतेची मूर्ती विधीनुसार स्थापित केली जाते, त्या शक्तीची दिव्य प्रभा मूर्तीच्या मध्यबिंदूपासून काही मीटर अंतरापर्यंत असते. ही प्रभा मूर्तीच्या जितक्या जवळ येऊ तसतशी वाढत जाते आणि जसजसे अंतर वाढते तसतशी ती कमी होते. अशा स्थितीत मूर्तीला प्रदक्षिणा घातल्याने शक्तींच्या प्रभावळीतून सकारात्मक ऊर्जा सहज मिळते. या संदर्भात धर्मग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की, भगवंताला प्रदक्षिणा घातल्याने शाश्वत पुण्य प्राप्त होते.
आता ही वैज्ञानिक प्रक्रिया सखोलपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. दैवी शक्तीच्या आभा मंडलाची गती दक्षिणवर्ती असते हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे त्याच्या दिव्यप्रभेचा प्रवास नेहमी दक्षिण बाजूकडून प्रवाहित असतो, म्हणून प्रदक्षिणा उजव्या बाजूने करावी असे म्हटले जाते. खरा अर्थ उजव्या बाजूने सरकणे असा आहे. असे केल्याने आपण आपल्या इष्टदेवतेच्या मूर्तीच्या विविध शक्तींचे तेज किंवा प्रभा प्राप्त करू शकतो, त्यांचे हे तेज अडथळे, संकटे नष्ट करण्यास सक्षम आहे, म्हणून पठण, अभिषेक वगैरे केल्यानंतर देवी-देवतांची प्रदक्षिणा करावी, असे म्हणतात.
कोणत्या दिशेने प्रदक्षिणा करावी?
श्रीकृष्णाच्या मूर्तीला ३ प्रदक्षिणा घातल्या जातात, तर देवीला एकच प्रदक्षिणा घालतात. साधारणतः पाच, अकरा प्रदक्षिणा करण्याचा सामान्य नियम शास्त्रसंमत आहे. शंकराच्या पिंडीला प्रदक्षिणा घालताना अभिषेकाची धार ओलांडू नये असे सांगितले जाते, म्हणून संपूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धीच प्रदक्षिणा घातली जाते आणि पुन्हा मागे येऊन उरलेली प्रदक्षिणा पूर्ण केली जाते. असेही मानले जाते की भगवान शंकराच्या मुर्तीतून निघणाऱ्या तेजोलहरी उजवीकडे आणि डावीकडे दोन्ही बाजूंनी प्रवाहित होत असतात. विरुद्ध दिशेने फिरल्याने, दैवी शक्तीच्या प्रभावळीची गती आणि आपल्यामध्ये असलेले दैवी अणू यांच्यात घर्षण निर्माण होते. परिणामी, आपले तेज नष्ट होते, म्हणूनच डावीकडून प्रदक्षिणा घालणे निषिद्ध मानले जाते.
अवध प्रहरी डिसेंबर २०२४