पाकिस्तानी ड्रोनवर भारतीय जवानांचा गोळीबार

SV    24-Jan-2025
Total Views |
 
श्रीनगर : पाकव्याप्त काश्मीरमधून एक ड्रोन भारतीय हद्दीत आलेला पाहून सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यावर गोळीबार करून पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ड्रोन पाकव्याप्त काश्मिरात परत गेला. ही घटना मंगळवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. बुधवारी पहाटे सुरक्षा दलांनी व्यापक तपासणी मोहीम राबवली. ड्रोनमधून कोणती शस्त्रे अथवा अमली पदार्थ टाकले आहेत का,  याचा शोध घेतला. मात्र,  तसे काही आढळून आले नाही.

पुढारी २३.१.२५