भारतीय मच्छिमारांची श्रीलंकेकडून सुटका

SV    24-Jan-2025
Total Views |
 

 

कोलंबो : श्रीलंकेच्या नौदलाने  ताब्यात घेतलेल्या ४१ भारतीय मच्छिमारांची सुटका झाली असूनत्यांना भारतात परत पाठवले आहे.  दोन्ही देशांच्या मच्छिमारांनाएकमेकांची सागरी हद्द ओलांडल्यामुळे अटक होण्याचे प्रकार अनेकदा घडत असतात. 'श्रीलंकेकडून ४१ भारतीय मच्छिमारांची सुटका करण्यात आली असून ते घरी परतण्याच्या मार्गावर आहेत,' असे भारतीय उच्चायुक्तांनी एक्सवर म्हटले आहे. भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांतील संबंधांमध्ये मच्छिमारांचा मुद्दा कायम वादग्रस्त ठरत आला आहे. श्रीलंका नौदलाच्या जवानांनी पाल्कच्या सामुद्रधुनीत भारतीय मच्छिमारांवर गोळीबार केला आहे.


महाराष्ट्र टाईम्स २३.१.२५