छत्तीसगडमधील जंगलातून माओवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त

SV    26-Jan-2025
Total Views |
 

             विजापूर- छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात माओवाद्यांनी ठेवलेला ५० किलो वजनाचा शक्तिशाली ‘आयईडी सुरक्षा दलांनी जप्त केला हा रिमोटद्वारा नियंत्रित ‘आयईडी दुर्गा मंदिराजवळ पुलाखाली ठेवला होता. सी.आर.पी.एफ.च्या बटालियनच्या बॉम्बनाशक पथकाला तो शोधण्यात यश 

आले. ६ जानेवारीला नक्षलवाद्यांनी ‘आयईडी स्फोटाने याच जिल्ह्यात एक वाहन उडविले होते; त्यात आठ पोलीस आणि चालकाचा मृत्यू झाला होता. यानंतर कोब्रा बटालियन आणि सी.आर.पी.एफ.च्या बटालियनच्या जवानांनी २१ ‘आयईडीसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत केला.


महाराष्ट्र टाईम्स २४.१.२५