अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरित भारतीयांना परत आणणार : परराष्ट्र मंत्रालय

SV    27-Jan-2025
Total Views |
 
        नवी दिल्ली : अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरित भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकार पावले उचलणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. भारत सरकार बेकायदेशीर स्थलांतरितांच्या समर्थनात उभे राहणार नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केले. अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरितांच्या हद्दपारीबाबतच्या निर्णयावर भारत सरकारने ही भूमिका घेतली आहे. अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांची सर्व कागदपत्रे मिळाल्यानंतर त्यांना भारत सरकार परत आणेल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
पुढारी २५.०१.२५