लिंबूवर्गीय फळांचे काढणीनंतर व्यवस्थापन – भाग २

SV    28-Jan-2025
Total Views |
 

       फळांची स्वच्छता व प्रतवारी

 काढणीनंतर किडलेलीनासलेलीदबलेलीफुटलेलीखरचटलेलीतडा गेलेली फळे बाजूला करावी. त्यानंतर त्यांची वजन व आकारानुसार प्रतवारी करावी. प्रथम दर्जाचीआकर्षक, टवटवीतमोठ्या आकाराची आणि ग्राहकांची पसंती लक्षात घेऊन अशी फळे मोठ्या आणि दूरवरच्या बाजारपेठांसाठी पाठवावी. फळांची काढणी करुन ती शेतावर सावलीत जमा केल्यानंतर बागेत किंवा शेतावरील शेडमध्ये साळीचे तणीस पसरून घ्यावेत्यावर काढणी केलेली फळे पसरावीत व २४ तास तशीच ठेवावीत. यामुळे फळातील उष्णता कमी होऊन फळात चाललेल्या मेटॉबोलिक क्रिया स्थिरावतील.

यानंतर फळे क्लोरिनच्या पाण्याने व नंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत. अशाप्रकारे धुतलेली फळे बुरशीनाशक द्रावणात ५ मिनिटे बुडवून ठेवावीत. या स्वच्छता प्रक्रियेमुळे पेनीसिलीय व अस्परजिलस या बुरशीमुळे होणारे रोग किमान ३ ते ४ आठवड्यापर्यंत नियंत्रणात राहतात. तसेच फळे धुतल्याने त्याचा मूळ रंगचकाकी व ताजेपणा कायम राहण्यास मदत होते.

काढणीपश्चात व्यवस्थापन प्रक्रिया

फळांची काढणी करणेकरंड्या किंवा टोपलीत ठेवून पॅकिंग शेडमध्ये वाहतूक करणेडिग्रीनिंगची प्रक्रिया करणेफळांना हलकासा ब्रश फिरवून फळे पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत सुकविणे फळांना २,४ डी व मेणाच्या द्रावणात बुडविणेफळांच्या रंगावरून मशिनद्वारे प्रतवारी करणेफळांची १२.८ ते १४.४ अंश सेल्सिअस तापमानाला १ ते ५ महिन्यापर्यंत साठवण करणेखराब फळे बाजूला करणेपुन्हा साबणाच्या बुरशीनाशकाच्या द्रावणात फळे धुवून त्यांच्यावरून हलकासा ब्रश फिरविणेप्रतवारी करणेफळे खोक्यात किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅक करणे व वाहतूक करणे.


कृषि पणन मित्र- नोव्हेंबर २०२४