लिंबूवर्गीय फळांचे काढणीनंतर व्यवस्थापन – भाग ३

SV    29-Jan-2025
Total Views |
 


लिंबूवर्गीय फळांची 
साठवण

फळांचे आयुष्य वाढविणे म्हणजे पर्यायाने ग्राहकाला अधिक काळपर्यंत फळे उपलब्ध करून देणे हा साठवणुकीचा मुख्य उद्देश असतोउत्पादनानंतर फळे केवळ साठवणीच्या सोयीअभावी नाश पावतातकाढणीनंतर फळांच्या अंतर्गत जैविक आणि रासायनिक क्रिया अखंडपणे चालू असतातयामध्ये बाष्पीभवनाची क्रियाश्वसनाची क्रिया  पिकण्याची क्रिया याचा अंतर्भाव होतोया सर्व क्रिया वातावरणाच्या तापमानाशी संबंधित असतातम्हणून त्यांची साठवण कमी तापमानाला आणि योग्य त्या आर्द्रतेला केल्यास वर सांगितलेल्या क्रियांचा वेग मंदावतो.

दुसरी बाब म्हणजे कमी तापमानाला सूक्ष्म जंतूंचा प्रादुर्भाव कमी असतोलिंबूवर्गीय फळे योग्य साठवण केल्यास त्याचे आयुष्य दुपटी तिपटीने वाढतेदेशात लिंबू (Lemon) उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचा चौथा क्रमांक लागतोआंतरराष्ट्रीय स्तरावर लिंबाच्या उत्पादनामध्ये अनुक्रमे मेक्सिकोभारत आणि अर्जेंटिना या देशांचा समावेश होतोसंपूर्ण भारतामध्ये लिंबाचे सुमारे १८ लाख मेट्रिक टन इतके उत्पादन घेण्यात येतेत्यापैकी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे .४० लाख मेट्रिक टन इतक्या लिंबाचे उत्पादन घेतले जाते.     

लिंबाच्या उत्पादनामध्ये भारतानंतर अर्जेंटिना या देशाचा क्रमांक लागत असला तरी लिंबू निर्यातीमध्ये अर्जेंटिनां या देशांचा आंतराराष्ट्रीय स्तरावर ४९ टक्के इतका वाटा आहेभारतामधून होणाऱ्या लिंबाच्या सुमारे १३ हजार मेट्रिक टन इतक्या निर्यातीपैकी जवळ जवळ ८५ टक्के लिंबाची निर्यात ही केवळ संयुक्त अरब राष्ट्रांना केली जात असूनइतर आयातदार देशांमध्ये नेपाळसौदी अरेबियामालदीवओमान आणि जर्मनी या देशांचा प्रामुख्याने सहभाग आहे.

 

कृषि पणन मित्र- नोव्हेंबर २०२४