नक्षलग्रस्त भागात डबल इंजिन सरकारच्या प्रयत्नांनी उजाडली नव्या विकासपर्वाची पहाट
SV 29-Jan-2025
Total Views |
या वर्षाच्या पाहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वामपंथी दहशतवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात जेथे दहशतवाद्यांच्या उपद्रवामुळे आजवर कोणतीही सार्वजनिक प्रवास सुविधा सुरू करता आलेली नव्हती त्या भागातील वांगेतुरी-गर्देवाडा-गट्टा-अहेरी बससेवेचा शुभारंभ स्वत: बसप्रवास करून केला आणि महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त असल्याने विकासापसून वंचित राहिलेल्या भागात विकासपर्वाची नवी पहाट उजाडली असल्याची प्रचिती संपूर्ण देशाला दिली.
आपल्या गडचिरोली जिल्ह्याच्या दौर्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी मार्ग व ताडगुडा पुलाचे लोकार्पण, लॉईड मेटल कंपनीच्या विविध विभागांचे भूमिपूजन/उद्घाटन तसेच नवीन हेलिपॅडचे उद्घाटन तर केलेच पण गडचिरोली शहर हे भारताचे ‘स्टील सिटी’ होईल, मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती मार्गाने गोंदिया आणि गडचिरोलीला जोडला जाईल असा निर्धार व्यक्त करून महायुती सरकारचे सर्वंकष विकासकेंद्री धोरणदेखील स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील डबल इंजिन सरकारच्या समन्वयाने वामपंथी दहशतवादी संघटनांच्या हिंसाचारामुळे सातत्याने भरडत गेलेल्या भागात युती सरकारने मिळवलेले हे यश एवढे दैदीप्यमान आहे की त्यासाठी केवळ पंतप्रधान मोदी यांनीच ट्विट करून फडणवीस आणि राज्याची पाठराखण केली.
एवढेच नाही तर महायुती सरकार आणि फडणवीस यांना सातत्याने टोमणे मारत कट्टर विरोध करणार्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेलादेखील पक्षाच्या सामना वृत्तपत्रात “देवाभाऊ अभिनंदन” अशा शीर्षकाचा अग्रलेख लिहून फडणवीस आणि महायुती सरकारचे कौतुक करणे भाग पडले.
वायुवेग ०४/०१/२५gfgfhg