भारतीय गावातील ६० लोकांना ४० सैनिकांचे २४ तास संरक्षण
SV 30-Jan-2025
Total Views |
गेल्या पाच महिन्यांपासून भारत आणि बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या तणावामुळे सीमेवर राहणाऱ्या हजारो भारतीयांच्या अडचणी वाढल्या आहेत. यातील ६० जणांना बीएसएफचे ४० जवान २४ तास सुरक्षा देत आहेत. हे लोक त्रिपुरातील उनाकोटी जिल्ह्यातील कैलाशहर या कसब्यापासून १५ किमी अंतरावर असलेल्या भारतीय सीमा कुंपणाच्या पलीकडे वसलेल्या मगरुली गावातील आहेत. इथल्या गावकऱ्यांना भारतात यायचं असेल तर ते सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते साडेचार या वेळात परत येऊ शकतात. बीएसएफ बटालियन क्रमांक १९९ येथे तैनात आहे, जिचे सैनिक कागदपत्रे तपासल्यानंतरच गावकऱ्यांना येण्या- जाण्याची परवानगी देतात. सध्या संपूर्ण बटालियन या गावकऱ्यांना सुरक्षा पुरवत आहे. याचे कारण म्हणजे बांगलादेश बॉर्डर गार्ड्सकडून दररोज मिळणाऱ्या धमक्या! शेजारील देशाचे सैनिक त्यांना शेतात काम करू देत नाहीत. ५ ऑगस्ट २०२४ पूर्वी बांगलादेशी सैनिक कधीही त्रास देत नसत, पण आता त्यांच्या जीवाचा धोका कायम आहे.
भारत आणि बांगलादेशमध्ये ५ राज्यांमध्ये ४ हजार किमी लांबीची सीमा आहे. त्रिपुराशी ८५६ किमी लांबीची सीमा जोडली गेली आहे. उनाकोटीला ७३ किमी लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. इथे अशी अनेक गावे आहेत जी कुंपणाच्या पलीकडे असल्याने बांगलादेशात वसल्यासारखी दिसतात.
दैनिक भास्कर १९.०१.२५