रायपुर-(छत्तीसगड)- येथील विजापूर राज्यातील छुटवाही गावात ७८ वर्षांनी वीज पोचली आहे. एक वर्षांपूर्वीपर्यंत या गावात पोचण्यासाठी सडकदेखील नव्हती. माओवाद्यांचा या भागावर कब्जा होता. दोन महिन्यांपूर्वी सुरक्षा दलांनी माओवाद्यांना इथून हाकलून लावले. अनेक चकमकींनंतर सुरक्षा दलाने या विभागावर ताबा मिळवला आणि एक सुरक्षा चौकी स्थापन केली. मग या गावाला वीजपुरवठा करण्यात आला. आता जल जीवन मिशनअंतर्गत पाणी, शाळा व अंगणवाडी, सार्वजनिक वितरण सेवा(रेशन) आणि मोबाईल टॉवर या सेवाही देण्यात येतील. विजापूर हे मुख्यालयाचे ठिकाण इथून ५० किलोमीटर अंतरावर आहे. पक्का रस्ता बांधून दळणवळण सुलभ केले जाईल.
नवभारत २.१२.२४