नर्मदापुरम येथील ख्रिस्ती अनाथाश्रमात हिंदू मुलीचे लैंगिक शोषण

SV    30-Jan-2025
Total Views |
 


              नर्मदापुरम (मध्यप्रदेश)- इटारसी येथे कार्यरत असलेल्या एका ख्रिस्ती मिशनरी संस्थेत राहणाऱ्या एका निराधार हिंदू मुलीचे एका ख्रिस्ती तरुणाने अपहरण केले. काही दिवस तिला त्याच्या बहिणीच्या घरी ठेवण्यात आले. चार दिवसांनी आरोपी तिला स्वत:च्या घरी घेऊन गेला आणि आठवडाभर तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिचे धर्मांतर करण्याचा संस्थेचा डाव होता असा आरोप राष्ट्रीय बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानुगो यांनी केला आहे.

या संपूर्ण प्रकरणात जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी निष्काळजीपणा दाखवला. हे मानवी तस्करीचे प्रकरण आहे. ख्रिस्त्यांच्या तुष्टीकरणासाठी अधिकाऱ्यांनी संस्थेला वाचवण्याचा आरोप केला असेही कानगो यांनी म्हटले आहे.


सनातन प्रभात ३.१२.२४