धार्मिक पर्यटनात वाढ

SV    31-Jan-2025
Total Views |
 

लखनौ- उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. अयोध्येत काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि राम मंदिराच्या उभारणीनंतर राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या वर्षी राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.  सन २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत सुमारे १७ कोटींनी वाढ झाली आहे.गेल्या वर्षी उत्तर प्रदेशात ६५ कोटी पर्यटक आले होतेतर २०२३ मध्ये ही संख्या ४८ कोटी होती. त्यापैकी अयोध्याकाशीमथुरा आणि प्रयागराज या धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या शहरांमध्ये ४१.५० कोटीहून अधिक पर्यटक आले आहेत. राम मंदिराच्या उभारणीनंतर २०२४ मध्ये अयोध्येत सर्वाधिक पर्यटकांची गर्दी झाली आहे. पर्यटन विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसारदेशासह परदेशातही उत्तर प्रदेशचे आकर्षण वाढले आहे. एका वर्षात विदेशी पर्यटकांच्या संख्येत सुमारे  लाखांनी वाढ झाली आहे.

नवभारत ३०.१.२५