'देशात आता सनातन बोर्ड'

SV    10-Feb-2025
Total Views |
 
     वक्फ बोर्डाच्या धर्तीवर देशात सनातन बोर्ड स्थापन होणार असल्याचा दावा मत्स्य व बंदरे विकासमंत्री नीतेश राणे यांनी केला आहे. 'सनातन बोर्डात सर्व हिंदूच असतील,' असे राणे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
'राज्यातील काही जमिनींवर वक्फ बोर्डाकडून दावा करण्यात येत आहे. मात्र, राज्यातील कोणतीही जागा वक्फ बोर्डाला देणार नाही,' अशी भूमिका नीतेश राणे यांनी मांडली. सन २०४७ मध्ये हे मुस्लिम राष्ट्र करण्याचा डाव आखला जातं असल्याचा आरोप करून राणे यांनी त्याविरोधात कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.
    दरम्यान, लातूरच्या तळेगावातील १०३ शेतकऱ्यांच्या ३०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केला होता. या प्रकरणी न्याय द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती.

महाराष्ट्र टाइम्स १०/०२/२५