अटलांटिक महासागर एकटीने पार करणारी पहिली महिला- अनन्या प्रसाद

SV    10-Feb-2025
Total Views |
 
               भारतीय वंशाच्या अनन्या प्रसाद हिने इतिहास घडवला आहे. अटलांटिक महासागर एकटीने पार करणारी पहिली महिला बनण्याचा विक्रम तिने आपल्या नावावर केला आहे. ३४  वर्षीय अनन्याने  रोव्हरने ५२  दिवसात ३००० मैल  प्रवास पूर्ण केला.  या कठीण प्रवासादरम्यान तिने  मानसिक स्वास्थ्य आणि मुलांच्या भल्यासाठी जागृती वाढवली.
                अनन्या बंगळुरूची रहिवासी असून ती ६वर्षांची असतानाच यूकेला गेली होती. तिथे तिने रोइंगची सुरुवात एक मजेदार व्यायाम म्हणून केली. पुढील काळात तो तिच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. अनन्याची ही यात्रा ११ डिसेंबर, २०२४ रोजी स्पेनच्या कॅनरी आयलँडपासून  सुरू झाली होती. तसेच, ३१ जानेवारी २०२५ रोजी कॅरिबियाच्या अँटिग्वा येथे संपली.

सकाळ ८.२.२५