निसर्ग व संस्कृती संपन्न ओडिशा (उत्कल) राज्यातील महाकवी बलरामदास यांनी पुरीच्या मंदिरात, भगवान जग्गनाथासमोर बसून लिहिलेले रामायण म्हणजे ‘जगमोहन रामायण’. या रामायणाला ‘दंडी रामायण’ म्हणूनही ओळखले जाते. हे रामायण उडिया भाषेतील आदि महाकाव्य असून, ते गोस्वामी तुलसीदासांच्या ‘रामचरितमानस’ आधीच्या काळातील आहे. यात १ लाख ९० हजार ओव्या (दंडी) आहेत आणि ७ कांड आहेत.
संतकवी बलरामदास यांना तेथील राष्ट्रकवी मानले जाते. हे जन्माने शुद्र असले तरी कर्माने, आचरणाने ब्राह्मण होते. बलरामदास यांनी लिहिलेले लक्ष्मीपुराण, गुप्त गीता, अमरकोश गीता, श्रीमद् भगवद्गीता, विराट गीता, गरुड गीता, अनंत गीता, उद्धव गीता, लिंग पुराण, ब्रह्म पुराण असे विपुल साहित्य आपल्याला दिसून येते.
मुं.त.भा. ९ फेब्रुवारी २५