पंबन - तामिळनाडू- हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात पुलांच्या उभारणीचे आव्हान पेलल्यानंतर भारतीय रेल्वेने आता आणखी एक तुरा आपल्या शिरपेचात खोचला आहे. पंबन येथे भर समुद्रात नवीन पूल यशस्वीपणे उभारला आहे. जहाजे जाण्यासाठी पुलाचा मध्यवर्ती भाग वर उचलून घेण्याची (व्हर्टीकल लिफ्ट) रचना असलेला हा रेल्वे पूल म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रवासी सुरक्षेचा संगम आहे. येत्या महिन्याभरात तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे रेल्वेचे नियोजन आहे.
११० वर्षे जुन्या ब्रिटिश पुलाशेजारी हा पूल उभारण्यात आला असून स्वयंचलित प्रणालीमुले अवघ्या साडेपाच मिनिटात ७२ मीटर लांबीचा भाग वर-खाली करणे शक्य झाले आहे. जुना पूल उघडण्यासाठी १६ व्यक्तींची गरज लागत होती आणि त्यासाठी सुमारे अर्धा तास वेळ लागायचा. तामिळनाडूतील मुख्य भूमी आणि रामेश्वरम बेटाला जोडणारया या पुलामुळे स्थानिक नागरिक आणि भाविक यांची मोठी सोय झाली आहे.
महाराष्ट्र टाईम्स ११.२.२५