मलेशियामध्ये साजरा केला जाणारा दुसरा सर्वात मोठा थाईपुसम सण!
SV 13-Feb-2025
Total Views |
मलेशियामध्ये ११फेब्रुवारी रोजी थायपुसम सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. येथील हिंदू बटू लेणीमध्ये असलेल्या श्री सुब्रमण्यम स्वामी मंदिरात भगवान मुरुगन यांची पूजा करतात. भगवान मुरुगन हे शिव आणि पार्वतीचे पुत्र कार्तिकेय.हा सण वाईटावर चांगल्याचा विजय यासाठी साजरा केला जातो. असे मानले जाते की या दिवशी देवी पार्वतीने भगवान मुरुगन याला तारकासुर आणि त्याच्या सैन्याला मारण्याचा आदेश दिला होता. तमिळ दिनदर्शिकेनुसार,हा सण थाई महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. यामध्ये हजारो भाविक दुधाने भरलेले हंडे घेऊन बटू लेणीकडे प्रयाण करतात. काही लोक स्वतःचे गाल, जीभ आणि पाठ भाले आणि हुकाने टोचतात, ज्यातून त्यांची तपस्या आणि आध्यात्मिक बळ दिसून येते. थाईपुसम हा मलेशियातील दुसरा सर्वात मोठा हिंदू सण आहे. या दिवशी देशात सार्वजनिक सुट्टी असते. थाईपुसम हा दक्षिण भारतातील तमिळ समुदाय साजरा करतात.
दैनिक भास्कर १२/०२/२५