तीन दहशतवादी पंजाबमध्ये अटकेत

SV    13-Feb-2025
Total Views |
 
         अमृतसर : पंजाब पोलिसांनी एक दहशतवादी गट उद्ध्वस्त करून तिघांना अटक केली. तीन फेब्रुवारी रोजी  एका बंद पोलिस ठाण्यात झालेल्या स्फोटात त्यांचा सहभाग होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून  एके-४७ रायफल, दोन पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली आहेत.अटक केल्यानंतर या दहशतवाद्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. यातील एकाने पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल खेचून गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर देताना केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. लवप्रीतसिंग, बुटासिंग आणि करणदीपसिंग अशी या दहशतवाद्यांची नावे असून, ते अमृतसर ग्रामीणमधील रहिवासी आहेत. हे सर्व दुबईतील एका व्यक्तीच्या संपर्कात होते, त्याने या तिघांना  पैसे आणि शस्त्रांसाठी मदत केली होती.

महाराष्ट्र टाईम्स ११.२.२५