जंगल लायब्ररी !

SV    14-Feb-2025
Total Views |
 
                पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथे  'जंगल लायब्ररी' सुरू करण्यात आली आहे. शहरातील मुले दर महिन्याला ३ दिवस जंगलात अभ्यास करतात, जेणेकरून ती मोबाईलपासून दूर राहतात, यामुळे त्यांची चिडचिड कमी होऊन एकाग्रता वाढते.
                मुलं दर महिन्याचे मधले तीन दिवस शुक्रवार ते रविवार जंगलात घालवतात आणि जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजातील मुलांबरोबर अभ्यास करतात. त्यामुळे स्थानिक मुलांशी त्यांचा संवाद वाढला आहे. जंगल वाचनालय सुरू करणाऱ्या ‘अनासृष्टी’ या संस्थेचे सचिव सुमंत साहा सांगतात, "शालबागन जंगल लायब्ररीमध्ये शहरातून मुलं शिकायला येतात. जंगलातील पक्ष्यांच्या किलबिलाटात अभ्यास करून ही मुले जंगलाशी नाळ जोडत आहेत. आमच्या जंगल वाचनालयात आतापर्यंत ९  शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. पालक तिसरी ते दहावीपर्यंतच्या मुलांना इथे घेऊन येतात. आम्ही त्यांचे नाव आणि पत्ता लिहून त्यांची नोंदणी करतो. यानंतर पालक मुलांना सोडून निघून जातात. आपली मुले मोबाईलशिवाय १५ दिवस जगत असल्याने पालक आनंदी आहेत". 
              हे वाचनालय सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू असते. येथे २५५ पुस्तके आहेत, ज्यात मुलांसाठी कथा, कविता आणि मासिकांची पुस्तके आहेत. मोठ्यांसाठी इतिहास आणि नाटकाशी संबंधित पुस्तके आहेत. वाचनालय विनामूल्य आहे, स्थानिक गावातील लोक आणि मुले वाचनालयाला भेट देतात. स्थानिक लोकांनी बांबूपासून बनवलेली सूपं वापरून  वाचनालयाचा पाया बांधला. यामध्ये त्यांनी एकाही खिळ्याचा वापर केलेला नाही, हे पूर्णपणे इको फ्रेंडली वाचनालय आहे. जिल्ह्यातील इतर जंगलातही अशी वन ग्रंथालये सुरू केली आहेत. 

दैनिक भास्कर ०३/०२/२५